युटय़ूबवर सर्वाधिक कमाईचा विक्रम नावावर
इंटरनेटच्या जगात काही युटय़ूबर कमाईमुळे लोकांचे रोल मॉडेल ठरले आहेत. असाच एक युटय़ूबर 10 वर्षीय मुलगा असून तो मागील 6 वर्षांमध्ये स्टार ठरला आहे. कमाईप्रकरणी त्याने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. रायन काजी हा छोटय़ा मुलांच्या जगात अत्यंत लोकप्रिय असून स्वतःच्या कमाईत दरवर्षी वाढ करत आहे. त्याची ह्युअरशिप दरवर्षी वाढत आहे.
रायन काजीला जग एक प्रसिद्ध युटय़ूबवर म्हणून ओळखते. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये रायन स्वतःची आई लोन आणि वडिल शिओन यांच्यासोबत मिळून युटय़ूब चॅनेल चालवितो, यात त्याच्या छोटय़ा जुळय़ा बहिणी केट आणि एमा देखील दिसतात. रायनच्या युटय़ूबल चॅनेलचे नाव रायन्स वर्ल्ड आहे.
2015 मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी रायनने युटय़ूबवर खेळण्याचा रीह्यू करणारे चॅनेल पाहून स्वतःच्या आईला अन्य मुलांप्रमाणे मी युटय़ूबवर का दिसत नाही असा प्रश्न विचारला होता. यातूनच प्रेरित होत त्याच्या आईने स्वतःची शिक्षिकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेत पूर्ण लक्ष युटय़ूब चॅनेल तयार करण्यावर केंद्रीत केले. युटय़ूबवर जाण्यापूर्वी कुटुंबाने स्वतःचे आडनाव गुआन बदलून काजी करून घेतले होते.
रायनची नेटवर्थ
रायनच्या युटय़ूबवर कोटय़वधींच्या संख्येत ह्युअर्सन त्याच्या अनेक व्हिडिओंच्या ह्युज अब्जावधीच्या संख्येत पोहोचल्या आहेत. रायनची स्वतःची नेटवर्थ 3.2 कोटी डॉलर्स आहे. तर एका अन्य आकलनानुसार हा आकडा आता 5 कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
कोटय़वधी सब्सक्राइबर्स
रायनच्या चॅनेल्सचे एकूण 4 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. रायनच्या व्हिडिओंना आतापर्यंत 44 अब्जांहून अधिक ह्यूज प्राप्त झाले आहेत. त्याच्या चॅनेलवर दरदिनी एखादा व्हिडिओ सादर होत असतो. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रायनच्या ह्यूज एग्स सरप्राइज टॉयज चॅलेंजला उच्चांकी 2 अब्जांहून अधिक ह्यूज मिळाले होते.
हजारो खेळण्यांची विक्री रायनच्या कुटुंबाने त्याच्या नावावर परवाना मिळविला असून यात रायन्स वर्ल्ड्सच्या 5 हजारांहून अधिक उत्पादनांमध्ये खेळणी, ऍक्शन फिगर्स, फेस मास्क, घरगुती सजावटीची सामग्री आहे. फोर्ब्सनुसार 2016-17 मध्ये रायनचे कुटुंब युटय़ूबद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱयांमध्ये 8 व्या स्थानावर होते. युटय़ूबवर रायनची मुख्य कमाई जाहिरातींद्वारे होते. रायनच्या वडिलांनी पॉकेट वॉच कंपनीशी करार केला होता. ही कंपनी त्याच्या युटय़ूब चॅनेलसाठी मार्केटिंग आणि विक्रीचे काम करते.