प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन मंडळाला कचरा संकलनासाठी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे 10 डस्टबिन देण्यात आले. विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांच्याकडे इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी डस्टबिन सुपूर्द केले. त्यामुळे आता बसस्थानकातील कचरा संकलन करणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय प्रवाशांनादेखील शिस्त लागणार आहे.
बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे परिसरात कचऱयाचे प्रमाण वाढते. बसमध्ये आणि बसस्थानकात कचरा टाकून प्रवासी परिसर अस्वच्छ करीत आहेत. याची दखल घेत इनरव्हीलतर्फे 10 डस्टबिनची सोय केली आहे. प्रवाशांना या डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याच्या सूचनादेखील करण्यात येत आहेत.
याप्रसंगी परिवहनचे पी. वाय. नाईक, सत्यनारायण, राधाकृष्णन, ए. वाय. शिरगुप्पीकर, अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर, सुनंदा करलिंगण्णावर, सुनीता हणमशेठ, मीलन मुतगेकर, श्रृती कित्तूर, गीता खडबडी, मेधा शहा, अक्षिता मैत्राणी उपस्थित होत्या.