Tarun Bharat

Sangli : सांगलीत 10 घरफोडींचा छडा; अट्टल चोरट्यांकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी

घरफोडीसह दुचाकी चोरणाऱया सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. तब्बल 10 घरफोडय़ांसह 13 दुचाकी गुह्यांचा छडा लावण्यात आला. संशयित चोरटय़ाकडून दुचाकी, दागिन्यांसह 13 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित हा कोल्हापूर जिह्यातील असून तौफिक सिकंदर जमादार (29, रा. उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शहरासह परिसरात घरफोडय़ांसह दुचाकी चोऱयाचे प्रमाण वाढले आहे. यातील संशयितांचा शोध घेवून कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. त्यावेळी अंकली फाटा परिसरात एक संशयित बिना क्रमांकाच्या दुचाकीवर येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एकजण संशयास्पदरित्या मिळून आले. सखोल चौकशी केली असता त्याने तौफिक जमादार असे नाव सांगितले. त्याच्याजवळील दुचाकीच्या कागदपत्रांची माहिती मागितली असता उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय बळावल्याने पोलिसी खाक्या दाखवत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मूर्ती व मुद्देमाल मिळून आला. सखोल चौकशी केली असता महात्मा गांधी पोलिस चौकीत संशयितावर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तसेच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले. त्यानुसार तौफिक जमादार यास अटक करण्यात आली. तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. त्यावेळी झालेल्या चौकशीत कुंभोज, शिरोळ, निमशिरगाव, औरवाड, हरिपूर, विश्रामबाग या परिसरात दुचाकी चोरल्याची समोर आले. त्या दुचाकी शामरावनगर येथील साई कॉलनी व उमळवाड येथे लावल्याच संशयिताने सांगितले. त्यानुसार पथका दोन्ही ठिकाणहुन साडे सहा लाखांच्या 13 दुचाकी जप्त केल्या.

दरम्यान, घरफोडीच्या अनुषंगाने संशयिताकडे चौकशी करण्यात आली. त्यानुसार काही दिवसांपुर्वी पोळ मळा, मिरजेतील ख्वॉजा वस्ती, शामरावनगर, मिरजेतील साई कॉलनी, शंभर फुटी रस्ता, मिरजेतील विद्यानगर, सांगली बसस्थानक परिसर, शाहू उद्यान परिसर, गारपीर परिसरातील बंद घरांचा कडीकोयंडा उचकटून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याची भांडी असा सात लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित तौफिक सिकंदर जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सांगलीसह संख्येश्वर, विजापूर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारवाईत विनायक सुतार, ऋतुराज होळकर, दीपक गायकवाड, नागेश खरात, हेमंत ओमासे, सुनील लोखंडे, कुबेर खोत, चेतन महाजन, संदीप नलवडे, सुनील जाधव, मेघराज रूपनर, निलेश कदम, दीपक गट्टे, शशिकांत जाधव, प्रकाश पाटील यांच्या सहभाग होता.

Related Stories

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अटक

datta jadhav

वाढीव पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा तिरडी मोर्चा

Archana Banage

कराड-रत्नागिरी महामार्ग २ तासासाठी रोखला

Archana Banage

सांगली : कोरोनाबाबत समुपदेशनासाठी ‘निमा’ची हेल्पलाईन

Archana Banage

सांगली जिल्ह्यात 813 कोरोनामुक्त, नवे 580 रूग्ण

Archana Banage

पाण्याच्या टीतून निघाले सहा साप, शेतकऱ्याची भंबेरी

Archana Banage
error: Content is protected !!