Tarun Bharat

कॅनडात हिंसक संघर्षात 10 ठार, 18 जखमी

ओटावा / वृत्तसंस्था

कॅनडामधील सस्केचेवान प्रांतात दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दोन्ही समाजाच्या लोकांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात 10 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ही घटना भयावह आणि दुःखद असल्याचे म्हटले आहे. तसेच तणावाच्या परिस्थितीवर सरकार आणि सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही स्पष्ट केले.

सस्केचेवान प्रांतात पसरलेला तणाव आणि हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही पीडितांवर संशयितांकडून जाणूनबुजून हल्ला करण्यात आल्याचे दिसते, परंतु उर्वरितांना लक्ष्य करण्यामागील कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॅमन सँडरसन आणि माईल्स सँडरसन अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही संशयित आरोपी रेजिना शहरातून पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असून नाकाबंदीही कडक करण्यात आली आहे. लोकांनाही सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

युक्रेनच्या 5 रेल्वेस्थानकांवर रशियाचा हल्ला

Patil_p

अमेरिका : दिलासा नाही

Patil_p

मोदी अन् जिनपिंग यांची भेट घडविणार पुतीन

Amit Kulkarni

गिनीमध्ये सैन्याकडून सत्तापालट

Patil_p

अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये संचारबंदी

Patil_p

युक्रेन राष्ट्राध्यक्षांची अचानक ‘ब्रिटनवारी’

Patil_p