तेहरान / वृत्तसंस्था
पूर्व इराणमध्ये एक प्रवासी रेल्वे रूळावरून घसरून बुधवारी मोठी दुर्घटना घडली. इराणच्या सरकारी टीव्हीच्या वृत्तानुसार प्रवासी रेल्वेचे 4 डबे रूळावरून घसरले. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. या अपघातानंतर रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त रेल्वेचे डबे बाजूला केल्यावर सदर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली.