Tarun Bharat

वॉलमार्टमध्ये गोळीबार, अमेरिकेत 10 ठार

Advertisements

हल्लेखोराचाही मृत्यू ः परिसरात बंदोबस्तात वाढ

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर, चेसापीक पोलिसांनी वॉलमार्टमधील हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे स्टोअरच्या व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱयांवर गोळय़ा झाडायला सुरुवात केल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आम्हाला वॉलमार्टमध्ये हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे, असे लिओ कोसिंस्की नामक पोलीस अधिकाऱयाने स्पष्ट केले.

आठवडाभरातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कोलोरॅडोमधील गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. पोलीस जवान दाखल होईपर्यंत काही लोक मृतावस्थेत दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या तपासानंतरच गोळीबारामागचे नेमके कारण समजेल. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही त्यांची चौकशी करणार असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

हल्लेखोर ठार झाल्याचा दावा

गोळीबार करणारा हल्लेखोर मृत झाल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.  या घटनेनंतर वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर प्रचंड पोलीस दल तैनात करण्यात आले होते. यासोबतच 40 हून अधिक आपत्कालीन वाहनांनाही इमारतीबाहेर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाने स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

Related Stories

एच 1 बी व्हिसाप्रकरणी ट्रम्पना धक्का

Omkar B

आजीसाठी खोटी ‘आई’च केली उभी

Amit Kulkarni

चीनी लसीची अशीही थट्टा…

Patil_p

डोनबासमधील 40 शहरांवर रशियाकडून हल्ले

Amit Kulkarni

फॉसी यांना हटविणार

Patil_p

भिंतीपलिकडचे दर्शविणारे उपकरण

Patil_p
error: Content is protected !!