शिरोळ/प्रतिनिधी
रेल्वेमध्ये नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दहा लाख पन्नास हजार रुपयाची फसवणूक केली असल्याची फिर्याद सुरज शंकर मोरे (रा गावडे गल्ली शिरोळ) यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी मौलाली मुल्ला (रा. नागठाणे ता. वाळवा) सय्यद शेख (रा.पलूस) शाहीन मुलांनी (रा. पुंदी ता. पलूस जि. सांगली) या तिघांनी मिळून फिर्यादी सुरज मोरे याला रेल्वेमध्ये नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन रोख चार लाख रुपये व त्यांच्या वडिलांच्या खात्यावरील आर टी जी एस द्वारे असे एकूण रक्कम दहा लाख पन्नास हजार रुपयाची फसवणूक केली आहे. ही घटना डिसेंबर 2020 साल ते आज अखेर रोजी घडली आहे. शिरोळ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगाराकडून आणखी काही गुन्हे उघडी येण्याची शक्यता असून कोणाची फसवणूक झाल्यास शिरोप पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरिगिडे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भोजने हे करीत आहेत.