10 people arrested in connection with the Kennedy raid
कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडा प्रकरणातील संशयितांवर अटकेची कारवाई करण्यासाठी अखेर कणकवली पोलिसांना तब्बल १३ दिवसांनी, सोमवारी मुहूर्त सापडला. रात्री उशिरा १० जणांना पोलिसांनी अटक केली . यात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सहा जणांना भा.दं.वि. ३०७ च्या गुन्हयात तर ४ जणांना भा.दं.वि. ३५३ च्या गुन्हयात अटक करण्यात आली. संशयितांना मंगळवारी दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अटकेतील संशयितांमध्ये ३०७ कलमाखाली कुणाल विजय सावंत (३४, सांगवे), योगेश रमाकांत वाळके (४२, कनेडी), मंगेश रामचंद्र सावंत (४८, भिरवंडे ), श्रीकांत नारायण सावंत (५०, भिरवंडे) , राजेश मधुकर पवार (५१, दिगवळे ), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली) तर ३५३ कलमाखाली अनिल राजाराम पांगम (५८, सांगवे), संतोष वसंत आग्रे (४९ , फोंडाघाट ), संदीप बाळकृष्ण गांवकर (२२,सांगवे), तुषार शामसुंदर गांवकर (२९, सांगवे) यांचा समावेश आहे.
कणकवली : वार्ताहर