Tarun Bharat

चीनमधील आगीत 10 जणांचा मृत्यू

  निवासी अपार्टमेंटच्या पंधराव्या मजल्यावर आग

बीजिंग / वृत्तसंस्था

चीनमधील शिनजियांगमध्ये एका निवासी इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या अग्नितांडवात 10 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ही आग गुरुवारी रात्री उशिरा लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या चार दिवसांतील आगीची ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. 22 नोव्हेंबर रोजी हेनान प्रांतात एका खासगी कंपनीच्या प्लान्टला आग लागली होती. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता. या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला  ताब्यात घेतले आहे.

Related Stories

सर्वात हुशार विद्यार्थ्यांमध्ये नताशा सामील

Patil_p

श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक

datta jadhav

ब्रिटनमध्ये 100 रुपयाच्या केळीसाठी दिले 1 लाख 60 हजार

Patil_p

हवामान बदलाने भारतही प्रभावित

Patil_p

ड्रोन हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण

Patil_p

पाकिस्तानच्या सीनेटमध्ये पहिले शिख सदस्य बनले गुरदीप सिंह

Patil_p