वृत्तसंस्था/ पुरी
ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरात शुक्रवारी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे 8 ते 10 भाविक बेशुद्ध झाले. या भाविकांना जिल्हा ऊग्णालयात नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे ही घटना घडल्याचे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (एसजेटीए) मुख्य प्रशासक रंजन कुमार दास यांनी सांगितले. कार्तिक महिना पवित्र मानला जात असून मोठ्या संख्येने भाविक भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर मंदिरात झालेल्या गर्दीमुळे काही भाविकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला. बेशुद्ध पडलेल्या भाविकांपैकी बहुतांश वृद्ध असल्याचे सांगण्यात आले.