Tarun Bharat

कोल्हापुरात १० कार फोडल्या, राजवाडा पोलिसांनी स्वप्नील तावडे या युवकाला घेले ताब्यात

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

कोल्हापूर: कोल्हापुरातील मंगळवार पेठेत १० ते १५ आलिशान फोर व्हीलर गाड्या फोडण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. कोल्हापूरातल्या मंगळवार पेठ परिसरातील पद्मावती मंदिरच्या पाठीमागील बाजूस ही घटना घडली आहे. अक्षरशः राजवाडा पोलिसांनी मंगळवार पेठ परिसरात राहणाऱ्या स्वप्नील तावडे या युवकाला ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी गेले असता सर्वांना चारचाकी गाड्यांच्या सर्व काचा फोडल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन याची माहिती घेतली. आणि मंगळवार पेठ परिसरात राहणारा स्वप्निल तावडे याला ताब्यात घेतले आहे. तावडे यांच्या घरात लोखंडी बार मिळून आला आहे. त्याच्याकडे तपास केला असता, मध्यरात्रीच्या सुमारास घरी आल्यानंतर घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणात त्याने स्वतःच्या आईला व बहिणीला मारहाण केली असल्याचे देखील पोलिसांनी सांगितला आहे. यातूनच त्याने हा प्रकार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यावरून तावडे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

भारत-चीन संघर्षावर पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

मध्य प्रदेश : काँग्रेस नेता पी. सी. शर्मा यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

Solapur : अज्ञात कंटेनरच्या धडकेत गृहस्थाचा मृत्यु

Abhijeet Khandekar

कोट्यवधींची संपत्ती असणारे दरेकर मजूर कसे?

datta jadhav

गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक; स्वतंत्र महामंडळ स्थापनेची मागणी

Archana Banage

‘त्या’ गावगुंडांना अद्दल घडवा

Archana Banage
error: Content is protected !!