दुसऱया महायुद्धाच्या पोशाखावर 8 लाख खर्च
घर देखील 1910 सालचे
अमेरिकेच्या टेक्साच्या डलास येथे राहणारी ग्वेन्डोलिन एरिन पॅटरसन केवळ दुसऱया महायुद्धाच्या काळातील पोशाख परिधान करते. तिने थ्रिफ्ट स्टोअरमधून अशाप्रकारचे पोशाख खरेदी करण्यासाठी 10 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 लाख रुपये खर्च केले आहेत, यामुळे पॅटरसन चर्चेत आली आहे.
25 वर्षीय पॅटरसनचे स्वतःच्या पोशाखावरून अनेकदा कौतुक होते. आता ती केवळ 1930 आणि 1940 च्या दशकातील पोशाखच परिधान करते. तिच्या अशाप्रकारच्या ड्रेस कलेक्शनमध्ये 50 व्हिंटेज टोपी, 60 बॅग आणि 75 कपडे सामील आहेत. यांची किंमत 10 हजार डॉलर्सहून अधिक आहे.
पोशाखावरून प्रत्येकाचा होतो गोंधळ
आपण कोणते कपडे घालावेत यावरून प्रत्येक जण गोंधळात पडत असतो. सार्वजनिक ठिकाणी जाताता कुठले कपडे घालावेत हे ठरविणे सर्वात अवघड असते. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे पोशाख निश्चित आहेत. पार्टीत जायचे असल्यास काहीसे मॉडर्न, ऑफिससाठी वेगळा, लाँग टूरसाठी वेगळा, मित्रांसोबत काहीसे वेगळा आणि कुटुंबासमवेत असताना वेगळा पोशाख घालावा लागतो. ज्याप्रकारचे मूड आणि स्थिती त्यानुसारच पोशाख असतो असे पॅटरसनचे म्हणणे आहे.
पतीचीही मिळते साथ
पॅटरसनने प्रियकर सॅमसोबत विवाह केला आहे. पती देखील 1940 च्या काळातील पेहरावांचा चाहता आहे. त्यांनी स्वतःच्या विवाहात दुसऱया महायुद्धाच्या काळानुसार कपडे घातले होते. आम्ही एखाद्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी असे पेहराव केल्याचे लोकांना अनेकदा वाटते. आमच्या अनोखा ड्रेसनुसार लोक अजब कॉमेंटही करतात. अनेक लोक टीकाकार असतात, तर अनेकांकडून कौतुक देखील होत असल्याचे सॅम यांनी म्हटले आहे. पॅटरसनकडे जीआय सैन्याचा कार देखील आहे. ती पेशाने रियल इस्टेट एजंट आहे.
जुन्या चित्रपटांच्या व्यक्तिरेखा
व्हिंटेज माझ्या जीवनाशी जोडले गेले आहे. मी दर दिनी जुने कपडे परिधान करते आणि माझ्याकडे जे काही आहेत ते 1930 आणि 40 च्या दशकातील आहे. मी नेहमीच एखाद्या जुन्या अभिनेत्रीप्रमाणे दिसू इच्छिते. ऑड्रे हेपबर्न आणि मर्लिन मुन्रो यांच्या लाइफस्टाइलने अत्यंत अधिक प्रेरित असल्याचे पॅटरसन सांगते.