आजोबांची कब्र पाहून भावुक झाले दांपत्य
एक दांपत्य इंग्लंडमधून स्वतःच्या पूर्वजांची कब्र शोधत शिमला या शहरात पोहोचले. शिमला शहरात इंग्रजांचा जन्म आणि मृत्यूबद्दल पूर्ण तपशील नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. 2005 मध्ये इतिहासकार सुमित यांनी शिमला वॉक्स सुमित राज या पुढाकाराची सुरुवात केली होती. याच्या माध्यमातून अन्य देशांमधून येणाऱया लोकांना शिमल्यात त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतिस्थळांना शोधण्यास मदत होते.
स्वतःच्या पूर्वजांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधून अनेक लोक शिमला येथे पोहोचतात. असेच एक दांपत्य इंग्लंडमधून आले होते. त्यांनी स्वतःच्या आजोबांचे जन्म अन् मृत्यूप्रमाणपत्र तसेच वडिलांचे जन्मप्रमाणपत्र शिमला पालिकेकडून प्राप्त केले आहे. सायमन अन् सेली यांना याकरता इतिहासकार सुमित राज यांनी मदत केली. याचबरोबर सायमन यांच्या आजोबांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आले होते, तेथे सुमित यांना नेले. यादरम्यान सायमन स्वतःच्या आजोबांची कब्र पाहून भावुक झाले. विलियम लिटरस्टर हे शिमला पालिकेत शासक पदावर तैनात होते. त्यांचे निधन 27 नोव्हेंबर 1930 रोजी झाले हेते, ज्यानंतर त्यांना संजौली येथील दफनभूमीत दफन करण्यात आले होते. तर सायमन यांचे वडिल सिरिल बीट यांचा जन्म 2 जुलै 1916 रोजी शिमल्यात झाला होता. ते येथे सत्र न्यायाधीश पदावर तैनात होते. सुमित यांनी ब्रिटिश दांपत्याला पालिकेकडून दस्तऐवज मिळवून देण्यास मदत केली आहे.