नातींनी केला आजीचा मेकअप, नातवांनी केली आजोबांची तयारी
100 वा वाढदिवस अविस्मरणीय
वाढदिवस किंवा जन्मदिन संस्मरणीय करण्यासाठी आता नानातऱहेचे उपक्रम सगेसोयऱयांकडून राबवले जातात. त्यातच एखाद्याच्या जीवनातील 100 वा वाढदिवस आला की नातेवाईकांच्या उत्साहालाही उधाण येते. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये नुकताच घडला. एका वयोवृद्ध व्यक्तीने आपली शंभरी ‘पुनर्विवाहा’ने साजरी केली. मुर्शिदाबाद जिह्यातील विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली 90 वषीय पत्नी सुरोदवानी हिच्याशी पुनर्विवाह केला. त्यांच्या आयुष्यातील शतक साजरे करण्याची ही त्यांची पद्धत होती.
आजी-आजोबा जियागंजच्या बेनियापुकुर गावात राहतात. तर आजीचे माहेर 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामुनिया गावात होते. मात्र, या पुनर्विवाह सोहळय़ाची कोणतीही कुणकुण वृद्ध दाम्पत्याला लागू न देता आजीला दोन दिवसांपूर्वीच माहेरी पाठविण्यात आले होते. या जोडप्याचा विवाह 1953 मध्ये झाला होता. त्यांची मुले, नातवंडे आणि पणतवंडे इतर राज्यात राहतात. मात्र, लग्नासाठी सर्वजण गावी आले होते. नातींनी 90 वर्षांच्या ‘नववधू’ची सर्व तयारी करण्यात मदत केली. तर नातवांनी 100 वर्षांच्या वराला सांभाळले. विश्वनाथ सरकार बुधवारी आपल्या नववधूला घोडय़ावर बसवण्यासाठी बामुनिया येथे पोहोचले होते. वरात येताच फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी वधू-वरांनी एकमेकांना फुलांचा हार घातला. यावेळी निवडक पाहुणे मंडळी आणि शेजाऱयांनाही आमंत्रित करण्यात आले होते. तसेच मेजवानी आयोजित केली होती.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर अशाचप्रकारचा सोहळा पाहिल्यानंतर पुनर्विवाहाची कल्पना आम्हाला सुचली. त्यानंतर मी ही कल्पना कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितली. मग ही योजना राबविण्यासाठी सर्वांनीच मला साथ दिली, अशी माहिती वृद्ध जोडप्याची सून गीता सरकार हिने दिली.