125 संशयित हॅकर्स ताब्यात : दिल्लीपासून अंदमानपर्यंतच्या लोकांना केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा पोलिसांनी सुमारे 100 कोटींच्या सायबर फसवणुकीचा मोठा पर्दाफाश केला आहे. हॅकर्सच्या अ•dयांवर एकाचवेळी छापे टाकल्यानंतर सुमारे 28,000 प्रकरणे शोधून काढली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ऑफर देत असत. सिमकार्ड, आधार कार्डच्या आधारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत त्यांच्या खात्यातील पैसे बनावट बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचे प्रकार उघड झाले आहेत.
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने हरियाणापासून देशाची राजधानी दिल्लीपर्यंत आणि उत्तर प्रदेशपासून अंदमान-निकोबारपर्यंतच्या लोकांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच 5 हजार पोलिसांच्या 102 पथकांनी एकाच वेळी नूहच्या 14 गावांमध्ये छापे टाकले. यावेळी सुमारे 125 संशयित हॅकर्सना ताब्यात घेण्यात आले. यापैकी 66 आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर करून 7 ते 11 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
40 सायबर तज्ञांकडून चौकशी
या सायबर गुन्हेगारांची चौकशी करण्यासाठी हरियाणाचे डीजीपी प्रशांत कुमार अग्रवाल यांनी संपूर्ण हरियाणातील 40 सायबर तज्ञांची टीम तयार केली. छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि सिमकार्ड यांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली. तसेच टीएसपी, आयएसपी, बँक, एनपीसीआय, यूपीआय, यूआयडीएआय, डीओटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप, ओएलएक्स आदींशी संबंधित माहितीही मागवण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर आकर्षक ऑफर्स देऊन ठग लोकांना आपल्या जाळ्यात अडकत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचीही मदत घेण्यात आली होती. त्यानंतर, जप्त केलेल्या मोबाईल सिमच्या तपासादरम्यान, सायबर ठगांनी आतापर्यंत देशभरातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 28 हजार लोकांची 100 कोटी ऊपयांहून अधिक फसवणूक केल्याचे समोर आले. या सायबर घोटाळेबाजांविऊद्ध देशभरात आतापर्यंत 1,346 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
तपासात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 219 खाती आणि 140 युपीआय खात्यांचा वापर सायबर फसवणूक करण्यासाठी केला जात असल्याची माहितीही समोर आली आहे. ही बँक खाती प्रामुख्याने ऑनलाईन सक्रीय असल्याचे आढळून आले. नोकरी देण्याच्या बहाण्याने आणि नंतर आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन केवायसी करून घेत फसवणूक केली जात होती.
फसवणूक करणाऱ्यांनी दूरसंचार कंपन्यांच्या हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, पंजाब, ईशान्य, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक सर्कलमधून सक्रीय केलेली 347 सिमकार्ड जप्त केली आहेत.