शिक्षण मंत्रालयाबाहेर दोन शक्तिशाली स्फोट ः ‘अल-शबाब’कडे
मोगादिशू / वृत्तसंस्था
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शिक्षण मंत्रालयाबाहेर झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी देशाचे राष्ट्रपती सर्व वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी या हल्ल्याचा आरोप इस्लामिक दहशतवादी गट अल-शबाबवर केला आहे. या स्फोटानंतर देशात हायअलर्ट जारी करण्यात आला असून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.
सोमालियाच्या शिक्षण मंत्रालयाबाहेर दोन कारमध्ये स्फोट झाले. या दुर्घटनेत महिला, वृद्धांसह काही बालकांचाही मृत्यू झाला. राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी दोन कार बॉम्बस्फोट झाले. सुरुवातीला 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर रविवारपर्यंत मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. हल्ल्याचे धागेदोरे तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार धरत या हल्ल्याला ‘भ्याड’ असे संबोधले आहे.
पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी हल्ला
रुग्णालयातील कर्मचाऱयानी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर शेकडो जखमींना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी शनिवारी रात्रीपर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. त्यानंतर रविवारी मृतांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती क्यक्त केली जात आहे. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.