Tarun Bharat

अफगाण भूकंपात 1 हजार बळी

1,700 हून अधिक जखमी ः हजारो घरांची पडझड ः भारत-पाकिस्तानातही जाणवले धक्के

काबूल / वृत्तसंस्था

Advertisements

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या भूकंपात मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे किमान एक हजारहून अधिक बळी गेले असून जवळपास 1,700 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (यूएसजीएस) भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 40 किमी अंतरावर होता. या भूकंपाचा प्रभाव 500 किमीच्या परिघात असल्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

अफगाणिस्तानमधील पाकटिका प्रांतातील चार जिल्हय़ांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर शक्तिशाली भूकंप झाला. यामध्ये असंख्य घरे उद्ध्वस्त झाल्याचे अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करिमी यांनी ट्विट करून सांगितले. तसेच आपत्कालीन संस्थांना मदतीसाठी हात देण्याचे आणि दुर्घटनाग्रस्त भागाला त्वरित मदत पुरवण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांना त्यांनी दिले आहेत. पहाटेच्या वेळेस भूकंप झाल्याने अनेकजण झोपेत होते. जीवितहानीची संख्या वाढू शकते असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खोस्ट नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर

 या भूकंपात अनेक घरे कोसळली असून ढिगाऱयाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. पाकटिका प्रांतातील बारमल, झिरुक, नाका आणि ग्यान जिह्यात मृतांची संख्या सर्वाधिक आहे. ढिगाऱयाखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांची हेलिकॉप्टर परिसरात पोहोचली आहेत. जखमी लोकांना एअरलिफ्ट करण्याचे काम दिवसभर सुरू होते.

पाकिस्तानातील शहरेही हादरली

या भूकंपाचे धक्के पाकिस्तान आणि भारतातही जाणवले, पण तिथे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यापूर्वी गेल्या शुक्रवारी पाकिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

अफगाणिस्तानात हा देश टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱया भूमीवर वसल्यामुळे येथे नेहमीच भूकंप होत असतो. अनेक फॉल्ट लाईन्स इथून जात असल्यामुळे हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7,000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार स्पष्ट झालेले आहे. कित्येक दशके सततच्या संघर्षामुळे भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात या देशाला अपयश आलेले आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याआधीही अफगाणिस्तानच्या आपत्ती निवारण सेवेला नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतकार्य पोहचवण्यात अडचण येत होती. या विभागाकडे फारच कमी विमाने आणि हेलिकॉप्टर्स असल्यामुळे लोकांचा बचाव करण्यात अडथळे येतात.

Related Stories

महिंदा राजपक्षे यांचा दणदणीत विजय

Patil_p

डेटिंगचे कोचिंग देतेय मॉडेल

Patil_p

कोरोनावर ‘डायएबीझेडआय’ औषधाचा एकच डोस पुरेसा

datta jadhav

एर्दोगान यांच्यानंतर इम्रान यांची मॅक्रॉन यांना धमकी

Patil_p

नदीत पाण्यासह वाहते सोने

Patil_p

भारतात गुंतवणूक न कराल, तर संधी गमावाल

Patil_p
error: Content is protected !!