पोलिस सर्वेक्षणातील माहिती
प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोव्यात एकूण 1950 ज्ये÷ नागरिक वास्तव्य करून आहेत. त्यातील 1006 जण घरात एकटेच राहतात तर 475 जोडपी राहतात, पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
या ज्येष्ठ नागरिकांसाठी दक्षिण गोवा पोलिसांनी एक विशेष कार्यक्रम राबवला आहे. त्यानुसार पोलिसांनी या लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगात वा अन्य वेळी ते त्याच्या मदतीस धावून जाऊ शकतात.
70 ते 79 वयोगटातील संख्या जास्त
1950 पैकी 60 ते 69 वयोगटातील 784 तर 70 ते 79 या वयोगटात 840, 80 ते 90 या वयोगटात 279 व 90 ते 99 या वयोगटातील 46 व्यक्ती आहेत. शतक पार केलेलीही व्यक्ती आहे. दक्षिण गोव्यात एकूण 14 पोलिस स्थानके आहेत. या चौदापैकी पाच पोलिस स्थानकांत 1077 ज्ये÷ नागरिक राहतात. सर्वाधिक 334 ज्ये÷ नागरिक किनारपट्टी भागात आहेत. त्यात 69 जोडपी तर 196 व्यक्ती आहेत.
एकाकी राहणाऱयामध्ये मडगाव अग्रस्थानी
मडगावात 112 एकाकी तर 49 जोडपी राहतात. मायणा-कुडतरीत 110 एकाकी तर 65 जोडपी, फातोर्डात 77 एकाकी व 41 जोडपी, कुंकळ्ळीत 50 एकाकी व 45 जोडपी, केपेत 49 एकाकी व 12 जोडपी, कुडचडे 71 एकाकी व 27 जोडपी, सांगेत 42 एकाकी व दोन जोडपी, काणकोणात 84 एकाकी व 36 जोडपी, मोठय़ा शहरात मोडणाऱया वास्कोत केवळ 28 जण एकाकी राहतात, त्याचबरोबर 27 ज्ये÷ नागरिक जोडपी आहेत. वेर्णा पोलिस स्थानक कक्षेत हे प्रमाण अनुक्रमे 52 व 48 असे आहे. मुरगावमध्ये ते प्रमाण अनुक्रमे 11 व 4, फोंडय़ात 94 व 43 तर कुळे येथे ते 30 व 7 असे आहे. ही आकडेवारी जून 2022 अखेरची आहे.