नवी दिल्ली : कोरोना संक्रमणासंबंधी देशात चांगले वृत्त आहे. 107 दिवस म्हणजेच सुमारे 4 महिन्यांनी देशात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा 5 लाखांपेक्षा कमी झाली आहे. म्हणजेच एकूण 86 लाख 34 हजार 341 रुग्णांपैकी आता केवळ 4 लाख 94 हजार 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 80 लाख 10 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणामुळे 1 लाख 27 हजार 581 जण दगावले आहेत. देशात 24 तासांमध्ये 44,281 नवे रुग्ण सापडले असून 512 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 27 जुलै रोजी 4 लाख 95 हजार 622 ऍक्टिव रुग्ण होते. मंगळवारी 10 हजार 476 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.
Previous Articleबोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी पोलीस तपासाची होणार पडताळणी
Next Article भारत, चीन माघार घेण्यावर सहमत ?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.