प्रतिनिधी /बेळगाव
कर्ले, ता. बेळगाव येथे बेकायदा दारू विकणाऱया एका तरुणासह अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे. सीसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 108 लिटर गोवा बनावटीची दारू, एक कार व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, एस. एच. नेसण्णावर, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ आदींनी ही कारवाई केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
साहील लक्ष्मण पाटील (वय 19) रा. बहाद्दरवाडी असे अटक करण्यात आलेल्या एका तरुणाचे नाव असून आणखी एक जण अल्पवयीन आहे. बहाद्दरवाडी येथील लक्ष्मण ऊर्फ बाळय़ा सातेरी पाटील हा गोव्याहून दारूसाठा मागवून आपल्या मुलांमार्फत त्याची विक्री करतो, अशी माहिती मिळाल्यामुळे अचानक छापा टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.