प्रतिनिधी/ बेळगाव
रथसप्तमी निमित्त आयएमए व वूमन्स डॉक्टर विंगतर्फे मिलीनियम गार्डन येथे 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी प्रतिभा धामणेकर व अमोल जैन यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून घेतले.
याप्रसंगी आयएमएच्या अध्यक्षा स्वप्ना महाजन, सचिव डॉ. हेमंत कौजलगी, खजिनदार डॉ. बसवराज बिज्जर्गी यांच्यासह आयएमएचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे अभय मुतालिक यांच्या शेतावर जाऊन आयएमएच्या डॉक्टरांनी अग्निहोत्र सादर केले. त्यानंतर सूर्यनमस्कार घातले. यावेळी वरील डॉक्टरांसह डॉ. अनिता भांदुर्गे, डॉ. मंजुषा गिजरे आदी उपस्थित होते.