प्रतिनिधी /पर्वरी
देशातील दिव्यांग व्यक्तीना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात सामावून घेणे हेतूने हा ‘परपल फेस्ट’ नावाचा तीन दिवसांचा महोत्सव घडवून आणला आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच महोत्सव आहे. दिव्यांग लोकांना एकत्र आणणे हे खूप जिकिरीचे काम आहे कारण प्रत्येक व्यक्तीची कमतरता जाणून घेऊन त्यांना त्यानुसार साधन सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या नवभारत संकल्पनेला अनुसरून आज पर्यंत अडीच हजार दिव्यांग व्यक्तीना मोफत साधन सुविधा दिल्या आहेत. येणाऱया काळात उरलेल्या सर्व दिव्यांग लोकाना देणार आहोत. या आगळय़ां वेगळय़ा कार्यक्रम आयोजनाने गोव्याचे नाव आणखी उंचवणार आहे. सरकार हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
येथील संजय स्कूल मध्ये ‘परपल फेस्ट’ या महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई,संजय स्कूल चे अध्यक्ष सिद्धार्थ कुकळीकर , दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर,गायिका हेमा सरदेसाई व अन्य उपस्थित होते.सदर कार्यक्रम दिव्यांग आयोग, समाज कल्याण खाते आणि मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 6 ते 8 जानेवारी 2023 रोजी पणजी येथे होणार आहे.
समाजामध्ये दिव्यांग लोकविषयी आपुलकी निर्माण करणे,दिव्यांग व्यक्ती मधील न्यूनगंड दूर करणे व त्यांना समाजातील प्रमुख प्रवाहमध्ये सामावून घेणे हा या महोत्सव घेण्यामागचा प्रमुख हेतु आहे. या तीन दिवसात वेगवेगळी चर्चा सत्रे,मनोरंजनाचे कार्यक्रम,प्रदर्शन,अनुभव कथन,गाणी नृत्य अशा भरगच्च कार्यक्रमांकही रचना केली आहे. आतापर्यंत देश भरातील दोनशे दिव्यांग लोकानी आणि संस्थानी नाव नोंदणी केली आहे.हा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
यावेळी हेमा सरदेसाई यांनी या कार्यक्रमाल सुभेच्छा दिल्या. व आपणही सर्व प्रकारचे सहकार्य करणार अशी ग्वाही दिली. सुरवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या ‘परपल फेस्ट’ महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. गुरुप्रसाद पावसकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रीना बारेटो यांनी सूत्रसंचालन केले तर सदस्य सचिव ताह हजिज यांनी आभार मानले.