-113 महाविद्यालयातील सीएचबी धारकांच्या खात्यावर मानधन जमा
-3 कोटी 80 लाख 13 हजार 760 रूपयांची रक्कम शासनाकडून वर्ग
प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 133 अनुदानित महाविद्यालयातील सीएचबीधारनांचे मानधन दिवाळीपुर्वी मिळावे,अशी मागणी पुढे आली.त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीएचबीधारकांना 21 ऑक्टोबरपुर्वी मानधन देण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार 20ऑक्टोबर रोजी 113 महाविद्यालयातील सीएचबीधारकांच्या खात्यावर मानधन जमा केले आहे.त्यामुळे सीएचबीधारकांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे, अशी भावना सीएचबीधारकांकडून व्यक्त होत असून उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांच्या आभाराच्या पोस्ट गुरूवारी दिवसभर सोशल मिडीयावर फिरत होत्या.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सीएचबीधारकांच्या खात्यावर गुरूवारी मानधन जमा झाले. याचे श्रेय जाते ते शिवाजी विद्यापीठ प्रशासन, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालय आणि पुणे उच्च शिक्षण संचालक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठात सीएचबी प्राध्यापकांची नेमणूक झाल्यापासून पहिल्यांदाच सीएचबीधारकांची दिवाळी गोड झाली आहे. या प्राध्यापकांच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण असून दिवाळी खरेदीला प्राधान्य दिले गेल्याची भावना सीएचबीधारकांकडून व्यक्त होत आहेत.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- सोशल मीडियावर सिनेट निवडणूक प्रचार यंत्रणा सज्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील 113 महाविद्यालयाच्या खात्यात सहसंचालक कार्यालयाने सीएचबीचे मानधन जमा केले.महाविद्यालयांनी सीएचबीधारकांच्या खात्यावर मानधन जमा केले आहे.ज्या 20 महाविद्यालयांनी सीएचबीधारकांच्या मानधनाचे प्रस्ताव आलेले नाहीत,ती शिक्षण संस्था आणि प्राचार्य सर्वस्वी जबाबदार असेल.या 20 महाविद्यालयांनी सीएचबीधारकांच्या मानधनाचे प्रस्ताव का पाठवले नाहीत याचे स्पष्टीकरण सहसंचालक कार्यालयाने मागितले आहे.
सीएचबीधारकांचा आनंद पाहून समाधान वाटले
शिवाजी विद्यापीठ सीएचबीधारकांना दिवाळीपुर्वी दोन महिन्यांचे मानधन मिळाले आहे.त्यामुळे सीएचबीधारक गुरूवारी दिवसभर फोन करून आभार मानत होते.तसेच सीएचबीधारकांच्या ग्रुपवर शिवाजी विद्यापीठ,सहसंचालक कार्यालय आणि शासनाचे आभार मानत होते.त्यांचा आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटले.
डॉ.हेमंत कटरे (सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय )
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Shivaji University Election: ‘आघाडी’ने दिला ‘सुटा’ला चर्चेसाठी होकार
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी शब्द पाळला
सीएचबी प्राध्यापकांना दिवाळीपुर्वी मानधन दिले याचा आनंद आहे.आता रेंगाळलेली प्राध्यापक भरती गतिशील व्हावी,ही अपेक्षा आहे. तसेच विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालयाने त्वरीत मानधन मिळवून दिले,त्याबद्दल धन्यवाद मानावे तेवढे थोडे.
डॉ. किशोर खिलारे (राज्य समन्वयक प्राध्यापक भरती लक्षार्थ आंदोलन)