ठरली सर्वात महागडी दुचाकी
अलिकडेच हार्लेच्या एका दुर्लभ बाइकचा लिलाव करण्यात आला असून ही बाइक खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ दिसून आली आहे. ही बाइक 1908 हार्ले-डेव्हिडसन होती, जी आता लिलावात विकली जाणारी सर्वात महागडी बाइक ठरली आहे. 1908 हार्ले-डेव्हिडसन बाइकला लिलावात 9,35,000 डॉलर्स म्हणजेच 7.73 कोटी रुपयांची किंमत प्राप्त झाली आहे.
लोकांदरम्यान या बाइकची मोठी क्रेझ दिसून आली आहे. या स्ट्रप टँक बाइकचे एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करताच याला 8 हजारांहून अधिक लाइक्स आणि 800 हून अधिक कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.
1908 हार्ले-डेव्हिडसन बाइकचा लिलाव अमेरिकेच्या लास व्हेगास शहरात मॅकम ऑक्शनकडून आयोजित करण्यात आला होता. ही हार्ले-डेव्हिडसन स्ट्रप टँक अत्यंत दुर्लभ प्रकारच्या सर्वात जुन्या मॉडेल्सपैकी एक आहे. 1908 मध्ये निर्मित 450 बाइक्सपैकी ही एक असल्याचे मॅकम ऑक्शनकडून सांगण्यात आले.
ही बाइक 1941 मध्ये विस्कॉन्सिनच्या एका शेतात डेव्हिड उहलीन यांना आढळून आली होती. डेव्हिड यांनी ही बाइक स्वतःजवळ 66 वर्षांपर्यंत ठेवली होती. नंतर या बाइकचे नुतनीकरण करण्यात आले, ज्यात याची टँक, चाकं, सीट कव्हर आणि इंजिन बेल्ट पुलीची दुरुस्ती करण्यात आली. या मॉडेलला स्ट्रप टँक नाव देण्यात आले होते, कारण याच्या इंधन टाकीला निकेल-प्लेटेड स्टील स्ट्रपसोबत प्रेमद्वारे जोडण्यात आले होते.
केवळ 12 बाइक्स उपलब्ध
1908 मध्ये हार्ले-डेव्हिडसनने या मॉडेल्सच्या केवळ 450 युनिट्सची निर्मिती केली होती अणि आता यापैकी 12 बाइक्स उपलब्ध असल्याचे मानले जाते. 1907 चा एक स्ट्रप टँक लिलावात 7,15,000 डॉलर्समध्ये विकला गेला होता.