काशी विश्वनाथ कॉरिडॉर – 65 टक्के कार्य पूर्ण
वृत्तसंस्था/ वाराणसी
जग कोरोना संकटाला तोंड देत असतानाही दुसरीकडे काशीच्या कायापालटाचे काम थांबलेले नाही. वाराणसीत 650 कामगार दोन पाळय़ांमध्ये दिवसरात्र काम करत आहेत. ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. काशी विश्वनाथाचे स्वरुप आता आकार घेऊ लागले आहे. मंदिराच्या चौकाचे काम प्रगतिपथावर आहे. गुलाबी दगडांचे नक्षीदार सौंदर्य झळकू लागले आहे. धाम क्षेत्रातील इमारतींच्या भिंतीवर आता बालेश्वराचे दगड सजू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. येथे मणिमालाच्या मंदिरांचे ऐतिहासिक दस्तऐवजही जगासमोर सादर करण्याची तयारी आहे. हे दस्तऐवज सादर तयार करण्यासाठी पुरातत्व विभाग (एएसआय) भोपाळच्या टेम्पल सर्वेच्या तीन सदस्यीय पथकाने काम सुरू केले आहे. प्रकल्पात मिळालेला प्राचीन मंदिरांचा इतिहास, त्यांची प्राचीनता, वैशिष्टय़ांसह मंदिराच्या निर्मात्यांशी संबंधित माहिती जमविली जात आहे. काशी विश्वनाथ धामच्या उभारणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या 300 इमारतींमध्ये 60 हून अधिक छोटी-मोठी मंदिरे मिळाली आहेत.
19 इमारतींचे काम सुरू
कारागिर, इंजिनियर आणि कामगार 5.3 लाख चौरस फूटात धामाला आकार देण्यास कार्यरत आहेत. मंदिर परिसरापासून गंगा घाटपर्यंत 24 इमारती तयार केल्या जातील. यातील 19 इमारतींचे काम सुरू आहे. यात मंदिर परिसर, मंदिर चौक, जलपान केंद्र, अतिथिगृह, भाविक सुविधा केंद्र, संग्रहालय, अध्यात्मिक पुस्तक केंद्र, मुमुक्षु भवन रुग्णालयाची उभारणी सुरू झाली आहे. मंदिर चौकाचा हिस्सा सी आकारात तयार करण्यात येईल. येथून थेट गंगामातेचे दर्शन करता येणार आहे.
दररोज 2 लाख जण करू शकतील दर्शन
भूकंप आणि भूस्खलनाच्या स्थितीतही मुख्य मंदिर परिसराच्या भिंतीची मजबुती कायम राखण्यासाठी विशेष धातूचा वापर करण्यात येत आहे. काशी विश्वनाथ धामाची निर्मिती झाल्यावर 2 लाख सहजपणे सामावू शकतील. येथे पूर्वी भाविकांना उभे राहण्यासाठी 5 हजार चौरस फूट जागाही नव्हती. तर धामच्या निर्मितीनंतर दोन लाख भाविक एकाचवेळी येऊ शकतील.
70 टक्के क्षेत्रात वृक्षसंपदा
काशीच्या मणिकर्णिका आणि ललिता घाटापासून कॉरिडॉरची सुरुवात होईल. 5.3 लाख चौरस फुट क्षेत्रात तयार होणाऱया या भागात 70 टक्के जागा वृक्षसंपदेसाठी राखीव असणार आहे. धामपासून घाटाच्या दिशेने जाण्यासाठी ललित घाटावर प्रवेशद्वार तयार करण्यात येईल. याचबराब्sार सरस्वती फाटक, नीलकंठ आणि ढुंढिराज गेट येथूनही विश्वनाथ धाममध्ये प्रवेश करता येणार आहे. मंदिर परिसरात गर्भगृहाला लागून असलेले वैकुंठ मंदिर, दंडपाणिसह तारकेश्वर आणि राणी भवानी मंदिर राहणार आहे.