आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याचे कंपनीचे उद्दिष्ट
नवी दिल्ली
रिसायकलिंग कंपनी विकास इकोटेकने 119 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त होण्याचे ध्येय निश्चित केले आहे. कंपनीने सादर निवेदनानुसार कंपनीचे थकित कर्ज आता 42.5 कोटी रुपये आहे. विकास इकोटेकच्या अधिकाऱ्याने एका निवेदनात सांगितले की, ‘या आर्थिक वर्षात आतापर्यंत आम्ही आमच्या कर्जदारांना 118.70 कोटी रुपये दिले आहेत. आता आमचे उद्दिष्ट 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचे आहे. कंपनी पीईटी (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) संयुगे आणि पीव्हीसी (पॉलिव्हिनाईल क्लोराईड) संयुगे पुनर्वापराद्वारे तयार करते.