Tarun Bharat

‘कलाश्री’च्या 11 व्या सोडतीचे ढोकलेवाडीचे राजू कलगुटकर विजेते 10 ग्रॅम सोन्याचे ठरले मानकरी

प्रतिनिधी / बेळगाव

उद्यमबाग येथील कलाश्री बंब व स्टील फर्निचरच्या 11 व्या सोडतीचे भाग्यवान विजेते ढोकलेवाडीचे राजू कलगुटकर हे ठरले असून ते 10 ग्रॅम सोन्याच्या नाण्याच्या बक्षिसाचे मानकरी ठरले.

कलाश्रीच्या सभागृहात झालेल्या या 11 व्या बंपर सोडतीच्या निमित्ताने महिला उद्योजिका व रेड क्रॉस संघटना सदस्या डॉ. राजश्री तुडयेकर, शुभांगी भोसले माधुरी नेवागिरी या मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी कलाश्रीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांनी सर्व मान्यवरांना भेटवस्तू व पुष्प देऊन सन्मान केला. मान्यवरांच्या हस्ते 11 वी सोडत काढण्यात आली त्यात ढोकलेवाडीचे राजू कलगुटकर हे या बक्षिसाचे मानकरी ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना कलाश्री उद्योग समूह ब्रँडेड व मजबूत वस्तूंची विक्री करते, स्वच्छ व दर्जेदार किराणा साहित्य ग्राहकांना पुरवत असल्याने त्याची विश्वासार्हता वाढली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत महिना केवळ 600 रुपये भरून 15 महिन्यांनंतर सर्वसामान्य ग्राहकांना मनपसंत वस्तू घेता येते. 15 व्या भाग्यवान विजेत्याला तर कार भेट मिळणार आहे.

यावेळी वेळेत उपस्थित असलेल्या पाच भाग्यवान ग्राहकांनाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक, डीलर, हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. टी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

परिवहन कर्मचारी पुन्हा संपाच्या मार्गावर

Omkar B

पहिल्या किसान रेल्वेला बेळगावमधून दाखविला हिरवा झेंडा

Patil_p

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी आकाश मडिवाळर यांची निवड

Amit Kulkarni

सिकंदराबाद एक्स्प्रेस 30 जूनपर्यंत धावणार

Patil_p

प्रस्थापित माजी नगरसेवकांना धक्का

Amit Kulkarni

पट्टणकुडीतील वृद्धाला लुटणाऱया जोडगोळीला अटक

Patil_p