Tarun Bharat

12 तासात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मागील 12 तासात दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे.

यासंदर्भात काश्मीर आयजी यांनी सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील नायरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक या भागात सर्च ऑपरेशन राबवत होते. सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील मोठय़ा प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानीही सहभागी होता. ज्याचा पुलवामा हल्ल्यात सहभाग होता. 2019 मध्ये झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

तर बडगाम जिल्ह्यातील चरारे शरीफ येथे दुसरी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून एके-56 सह अन्य शस्त्रास्त्रे जप्त केली.

Related Stories

एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक’

Abhijeet Khandekar

उज्ज्वल निकमांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

Archana Banage

आजचे भविष्य शनिवार दि. 7 जानेवारी 2023

Patil_p

सांगली : जान्हवीच्या मदतीसाठी धावला अभिनेता अक्षय कुमार

Archana Banage

खुषखबर, एका दिवशी 705 रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखाचा टप्पा

datta jadhav