Tarun Bharat

12 लाखाचे बक्षिस लागल्याचे सांगून ऑनलाईन फसविले

Advertisements

प्रतिनिधी / मडगाव :

ऑन लाईनसह फसवणुकीची प्रकरणे सध्या वाढत चाललेली दिसत आहेत. पाजीफोंड मडगावच्या एका युवकाला 12 लाख रुपये किंमतीचे बक्षिस लागल्याचे कळवून ते नेण्यासाठी रक्कम भरा असे सांगून हजारो रुपयांना गंडा घातल्याचे एक ताजे प्रकरण पोलिसांत नोंद झाले आहे.

भल्या पहाटे एके दिवशी या प्रकरणातील या युवकाला फोन आला. तुम्ही स्नॅपडील ऑन लाईन खरेदी करीत होता. या ऑनलाईन खरेदी आस्थापनाचा आपण मॅनेजर बोलत आहोत. या आस्थापनाने एक स्पर्धा ठेवलेली होती आणि त्या स्पर्धेत तुम्ही 12 लाख रुपयांचे मानकरी ठरलेला आहात. अभिनंदन.  आनंदाची बाब आहे. या  12 लाख रुपयांवर दावा करण्यासाठी ‘तुम्ही ऑन लाईन माध्यमातून 5 हजार रुपये अमूक अमूक खात्यात भरा असे फोन करणाऱयाने सांगितले.

12 लाखाच्या तुलनेने 5 हजार काहीच नव्हते. मडगावच्या या युवकाने ही रक्कम भरली. फोन करणाऱयाच्या खात्यात 5 हजार रुपय्sढ जमा झाले होते. त्यानंतर मडगावच्या या युवकाला आणखी एक फोन आला. 12 लाख रुपये तुमच्यापर्यंत पोहोचते करण्यासाठी त्याला प्रेसेसींग फी लागणार असून त्यासाठी 6 हजार रुपये अमूक अमुक खात्यात जमा करा. त्यानुसार मडगावच्या या युवकाने हीही रक्कम भारतीय स्टट बँकेच्या सांगितलेल्या खात्यात भरली.

करता करता या युवकाने अंदाजे 30 हजार रुपयांची रक्कम भरल्यानंतर या युवकाचे डोळे उघडायला लागले आणि आपण फसत तर चाललो नाही ना याचा अंदाज घेऊ लागला आणि त्याचा अंदाज खरा ठरला.

12 लाख रुपयाचे बक्षिस लागले म्हणून सांगणाऱयाकडे या युवकाने पुन्हा संवाद साधला आणि काही सवाल केले तेव्हा आपण फसलो आहो याची त्याला जाणीव झाली. आता या प्रकरणात आपल्याला फक्त पोलिसाच साहाय्य करतील म्हणून त्याने पोलीस स्थानकाचा दरवाजा खटखटावला.

पोलिसांनी त्याची फिर्याद ऐकून घेतली. पोलिसांना हे काही नवे प्रकरण नव्हते. ऑन लाईन माध्यमातून फसवणुकीची सध्या गोव्यात आणि संपूर्ण भारतात शेकडो प्रकरणे घडत असतात.

पोलिसांनी पाजीफोंड -मडगाव येथील या युवकाचे फसवणुकीचे प्रकरण नोंद केला, सध्या अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली (फसवणूक करणे) गुन्हा नोंद केलेला आहे आणि सध्या तपास सुरु केला आहे. आज ना उद्या या प्रकरणातील आरापी सापडतीलही. मात्र, सध्या हा युवक आपल्या खिशातून अंदाजे 30 हजार रुपये घालवून बसला.

Related Stories

कोरोना प्रतिबंधक लसीची गोव्यात उद्या चाचणी

Patil_p

होली स्पिरीट चर्चमधील चोरी प्रकरणी एकाला अटक

Amit Kulkarni

चिखलीत धालोत्सवाने ग्रामस्थांचे लक्ष वेधले

Patil_p

चला करुया पाठदुखी, कंबरदुखीवर मात

Amit Kulkarni

राजेश फळदेसाई यांची वाहनसेवा ठरली मोठा आधार

Patil_p

हाताने गणेश मूर्ती साकारणारा अवलिया कलकार ज्ञानेश्वर वाडजी

Omkar B
error: Content is protected !!