स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 3 गुन्हे उघडकीस : कामगिरीचे वरिष्ठांकडून अभिनंदन
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 गुन्हे करुन फरारी असलेल्या अट्टल चोरटय़ास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिदर, कर्नाटक येथे जावून जेरबंद करण्याची कामगिरी बजावली आहे. त्याच्याकडून 2 घरफोडीचे व एक दुचाकीचा चोरीचा असे 3 गुन्हे उघडकीस आले असून विजय सिध्दाप्पा ढोणे (वय 29 सध्या रा. अलियाम्बूर, जि. बिदर, राज्य कर्नाटक, मूळ रा. हॉटेल लेक ह्यूच्या बाजुला, गोडोली, सातारा) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या चोरटय़ावर सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. या फरारी आरोपीस अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन त्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
तपास पथकाने सातारा जिल्हा पोलीस अभिलेखावरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱया आरोपीची माहिती काढून त्यास अलियाम्बुर, ता. बिदर राज्य कर्नाटक येथे जावून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साताऱयातील 69 हजार रुपयांच्या घरफोडीसह कर्नाटक राज्यातील बिदर येथील घरफोडीचा 1 गुन्हा व हैद्राबाद येथील मोटर सायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकुण 3 गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. त्याला अटक करुन तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रमोद सावंत, विशाल पवार, अमित सपकाळ, गणेश कापरे, अजित कर्णे, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे यांनी केली. या सर्वांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.
पोलीस निरीक्षक धुमाळ यांचा कामाचा धडाका
स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची बदली झाली. त्यानंतर दीड महिने स्थानिक गुन्हे शाखेला नेतृत्व नव्हते. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यावर पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे नाव अचानकपणे पुढे आले. त्यांनी एलसीबीचा चार्ज स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तांबे चोरटय़ांची टोळी पकडली, शिरवळ येथे बेकायदा पिस्टल प्रकरणी पुण्याचे आरोपी जेरबंद, कर्नाटकात जावून घरफोडीतील फरारी आरोपी जेरबंद करण्याची कामगिरी एलसीबीच्या टीमने बजावली आहे.
फोटो नावाने सेव्ह आहे.