प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळावरून आतापर्यंत खास 18 हवाई सेवाव्दारे एकूण 2994 विदेशी पर्यटकांनी मायदेशी उड्डाण केले आहे. काल सोमवारी ही सेवा नव्हती व आज मंगळवारीही विदेशी पर्यटकांचे उड्डाण होणार नाही. उद्या बुधवारी काही प्रवासी यु.के. ला उड्डाण करणार आहेत.
रविवारी पहाटे व संध्याकाळी मिळून तीन खास हवाई सेवाव्दारे 344 विदेशी पर्यटकांनी मायदेशी प्रयाण केले होते. यात स्पेन, जर्मनी व जुरीचच्या नागरिकांचा समावेश होता. भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यास काल 14 दिवस उलटले. विदेशी वकिलातीनी केलेल्या विनंतीनुसार भारत सरकारने त्यांच्या नागरिकांची मायदेशी पाठवणी करण्यासाठी दि. 25 पासून खास हवाई सेवा सुरू केली होती. गेल्या बारा दिवसांत रविवारपर्यंत एकूण 18 हवाई सेवांव्दारे 2994 विदेशी पर्यटकांनी भारताचा निरोप घेतला. यात 31 लहान मुलेही होती. काल सोमवारी एकाही विदेशी पर्यटकांने उड्डाण केले नाही. आज मंगळवारीही अशी सेवा असणार नाही. मात्र, उद्या बुधवारी एक हवाई सेवा उलब्ध करण्यात आलेली असून या हवाई सेवेव्दारे इंग्लणचे पर्यटक मायदेशी रवाना होणार आहेत.