बीएसएफकडून पश्चिम बंगालमध्ये कारवाई -4 हस्तकही ताब्यात
वृत्तसंस्था / कोलकाता
दक्षिण बंगाल प्रंटियर अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिमेच्या दरम्यान 12 बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला पकडले आहे. हे सर्वजण उत्तर 24 परगणा जिल्हय़ाच्या क्षेत्रातून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.
गुप्त माहितीच्या आधारावर सीमा चौकी परगुमटी 118 वाहिनीच्या जवानांनी या भागात पोलिसांसोबत शोधमोहीम राबविली. सीमा सुरक्षा दलाला पाहून जलील तरफदारच्या घरात लपलेल्या बांगलादेशी नागरिकांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. हे सर्वजण उत्तर गोविंद काठी गावाच्या दिशेने पळू लागले होते. बीएसएफने शोधमोहीम सुरूच ठेवून 12 बांगलादेशी नागरिक आणि 4 भारतीय हस्तकांना पकडले आहे.
बांगलादेशी नागरिक कामाच्या शोधात काही वर्षांपूर्वी भारतात दाखल झाले होते. तसेच ते भारतात विविध ठिकाणी काम करत होते. हे सर्वजण भारतातून बांगलादेश येथे स्वतःच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. याकरता भारतातील त्यांचा हस्तक जाकिर हुसैन तरफदार त्यांची मदत करत होता. पण बीएसएफने या सर्वांची धरपकड केली असून त्यांना हिंगलगंज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.