ऑनलाईन टीम / नाशिक :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध भागांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यातच आता आणखी एका शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे आहे.
आता नाशिक शहरातही 12 मे पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबत माहिती दिली. सततच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ते म्हणाले, नाशिक शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन 12 मे च्या दुपारी 12 वाजल्यापासून ते 22 मे च्या दुपारी 12 वाजेपर्यंत कायम असणार आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने बंद राहतील. तसेच हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल मिळणार आहे.