ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
फायझर आणि बायोएनटेकने विकसित केलेल्या कोरोना लसीची 12 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरू आहे. स्वयंसेवकांना चाचणीअंतर्गत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या कंपन्या लहान मुलांसाठी तीन वेगवेगळ्या लस तयार करण्याच्या विचारात असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
फायझरच्या प्रवक्त्या शॅरन कॅस्टिलो म्हणाल्या, अमेरिकेन नियामक महामंडळाने फायझर आणि बायोएनटेकची लस 16 आणि 17 वर्षाच्या मुलांना देण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता 12 वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात या लसीची चाचणी होणार आहे. यामध्ये 144 मुलांना सामाविष्ट करुन घेतले जाणार असून, 10, 20 आणि 30 मायक्रोगॅममध्ये दोन डोस देण्याची सुरुवातीची योजना आहे. अंतिम टप्प्यात साडेचार स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल. 2022 च्या सुरुवातीला ही लस बाजारात येण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.