ठोश्यांनी झाड पाडण्याची कामगिरी
जगातील सर्वात मजबूत मुलांच्या यादीत एवनिका सादवाकास्स नावाच्या मुलीचा देखील समावेश आहे. तिचे पंच मोठमोठय़ा लोकंना धूळ चारतील. अलिकडेच तिची एक चित्रफिती व्हायरल होत असून यात ती झाडावर पंच मारताना दिसून येते. एवनिका रशियाची रहिवासी असून ती दीर्घकाळापासून बॉक्सिंग करतेय. सोशल मीडियावर तिच्या चित्रफिती व्हायरल होत असतात. तिचे वडिल रुस्त्राम सादवाकास्स यांनी तिला बॉक्सिंगसाठी तयार केले आहे. एवानिकाचे वडिल स्वतः बॉक्सिंगचे कोच आहेत.
वयाच्या चौथ्या वर्षापासून बॉक्सिंग
एवानिका वयाच्या चौथ्या वर्षापासून बॉक्सिंग करत आहे. तिच्या हालचाली अत्यंत अचूक असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तिचे हार्डवर्क पाहता तिला बॉक्सिंगसाठी तयार करण्याचे प्रयत्न केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.
मिनिटात 654 पंच
एवानिकाने विश्वविक्रम देखील नोंदविला आहे. तिने एका मिनिटात 654 वेळा पंच मारले आहेत. ती दरवाज्यापासून अनेक दणकट गोष्टींना स्वतःच्या पंचनी उद्ध्वस्त केले आहे. तिच्या झाडाशी निगडित व्हिडिओवर मात्र अनेक लोकांनी टीका केली आहे.
पूर्ण कुटुंबच करते बॉक्सिंग
एवानिकाला 7 भावंडं असूनी ती सर्व बॉक्सिंगमध्ये सामील आहेत. त्यांनी स्वतःच्या वडिलांकडून बॉक्सिंगचे धडे गिरविले आहेत. एवानिकाची आई ऍनिया सादवाकास्स या जिमनॅस्ट होत्या.