व्हिएतनाममधील अनोखी घटना : किरकोळ जखमांवरच निभावले
व्हिएतनाममध्ये एक 2 वर्षीय मुलगी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली कोसळली, पण खाली उभ्या असलेल्या एक डिलिव्हरी ड्रायव्हरने (चालक) तिला हवेतच पकडल्याने ती बचावली आहे. मुलगी किरकोळ जखमी झाली असून सध्या ती रुग्णालयात आहे.
घटनेवेळी चालक नगुयेन नगोक माह (31 वर्षे) स्वतःच्या ट्रकमध्ये बसला होता. तेव्हा त्याने एका मुलीला बाल्कनीच्या कोपऱयात लटकताना पाहिल्यावर तिला वाचण्यासाठी त्याने वाहनातून बाहेर धाव घेतली. मुलीचा हात निसटताच ती खालच्या दिशेने आल्यावर चालकाने तिला हवेतच पकडले आहे. केवळ नशीब म्हणून ती माझ्या हातात विसावली, तिचा जीव वाचल्याने आनंदी असल्याचे चालकाने म्हटले आहे.