कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
वार्ताहर/ वाठारकिरोली
वेळू (ता. कोरेगाव) येथील सुपुत्र प्रशांत मनोहर भोसले (वय 34) वर्षे हे भारतीय सैन्य दलात हवालदार क्लार्क या पदावर सागर मध्यप्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन वीरमरण आले.
प्रशांत मनोहर भोसले यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वेळू येथे घेतले. माध्यमिक शिक्षण 12 वी पर्यंत मुंबई येथे झाले. प्रवीण लहानपणापासून सैन्य दलाचे आवड असल्याने ते लहान वयात सैन्यात भरती झाले. त्याच्या मागे आई, पत्नी, भाऊ, वहिनी, एक मुलगा, एक मुलगी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. प्रशांत भोसले हे अत्यंत मनमिळाऊ दुसऱयाला नेहमी मदत करण्याचा त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेळू परिसरात शोककळा पसरली.
प्रशांत मनोहर भोसले यांचा अंत्यविधी गुरुवार दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या मुळ गावी वेळू (ता. कोरेगाव) येथे शासकीय इतमामात होणार आहे.