Tarun Bharat

‘अल-कायदा’च्या दोघांना 12 दिवस पोलीस कोठडी

Advertisements

भोपाळमधून झाली होती अटक

कोलकाता / वृत्तसंस्था

मध्यप्रदेशातील भोपाळ येथून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अल-कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना हावडा न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना शुक्रवारी बंगालमध्ये आणण्यात आले. आरोपी एकरामुल हक आणि झहीरुद्दीन अली हे बांगलादेशी नागरिक असून त्यांना भोपाळ मध्यवर्ती सुधारगृहातून न्यायालयात हजर करण्यात आले. आता दोघांचीही हावडा येथील डोमजूर पोलीस स्टेशनमधील बेकायदेशीर दहशतवादी संघटना अल-कायदा आणि संबंधित मॉडय़ूलमध्ये सामील असल्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. या दोघांना पश्चिम बंगाल पोलिसांनी वाँटेड घोषित केल्याची माहिती स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) सूत्रांनी दिली.

कोलकाता एसटीएफची टीम बुधवारी भोपाळला पोहोचली होती. भोपाळ पोलिसांच्या मदतीने या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आले. दोन्ही दहशतवाद्यांनी नाव बदलून मध्यप्रदेशमध्ये आश्रय घेतला होता. काही दिवसांपूर्वी हावडा आणि दक्षिण 24 परगणा येथून अटक केलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याबाबत माहिती मिळाली होती. एसटीएफ युनिटने ऑगस्टमध्ये खरीबारी येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाच्या दोन संशयित सदस्यांना अटक केली होती.

Related Stories

संघाकडे नाही सरकारचा रिमोट कंट्रोल

Patil_p

नवा उच्चांक! 24 तासात 1.15 लाख बाधितांची नोंद

datta jadhav

‘पीओके’ ताब्यात घेण्यास लष्कर तयार : लष्करप्रमुख

prashant_c

महामार्गावर विमान, शेतात उतरले हेलिकॉप्टर

Patil_p

राम मंदिर ट्रस्ट अध्यक्षांची प्रकृती बिघडली

Patil_p

सरकारचा मोठा निर्णय : चीनला परत करणार खराब अँटीबॉडी टेस्ट किट

prashant_c
error: Content is protected !!