ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. 12 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले असून, त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात ग्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
माजी नगरसेवक रमेश धोंगडे, डी. जी. सुर्यवंशी, अजय बोरस्ते, सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, पुनम मोगरे, जयश्री खर्जुळ, ज्योती खोले, सुवर्णा मटाले यांच्यासह अन्य एकाने शिंदे गटात प्रवेश केला.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी वाढणार
ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला होता. शिवसेनेतून कुणीही बाहेर पडलेलं नाही, सगळे पदाधिकारी माझ्या भेटीसाठी आले आहेत. फक्त पालापाचोळा उडून गेला, असं राऊत यांनी त्यावेळी म्हटलं होतं. मात्र, आता आता डझनभर माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राऊतांच्या दौऱयानंतरही ठाकरे गटातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही, असे यावरुन दिसून येते.