Tarun Bharat

बेळगाव -सुलधाळ मार्गावर धावले ताशी 120 कि.मी. वेगाने इंजिन

Advertisements

आजही होणार स्पीड ट्रायल

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव-सुलधाळ या 27 कि. मी. च्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. या रेल्वेमार्गाची स्पीड ट्रायल सोमवारी घेण्यात आली. ताशी 120 कि. मी. गतीने रेल्वे इंजिन या मार्गावरून पळविण्यात आले. मंगळवारीही उर्वरित ट्रायल घेतली जाणार आहे.

मिरज-लोंढा या दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणजे बेळगाव-सुलधाळ या 27 कि. मी. चे दुपदरीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची तपासणी करण्यासाठी सोमवारी पहिल्या टप्प्यातील स्पीड ट्रायल नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने घेण्यात आली. प्रारंभी मोटार ट्रॉली इन्स्पेक्शन करण्यात आले. त्यानंतर स्पीड ट्रायल घेण्यात आली.

खबरदारी घेण्याचे नैर्त्रुत्य रेल्वेचे आवाहन

नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वेमार्गावरून स्पीड ट्रायल घेण्यात येत आहे. ताशी 120 कि. मी. वेगाने इंजिन धावत असल्याने कोणीही रेल्वेमार्गावर येवू नये, तसे आढळल्यास रेल्वे ऍक्टनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नैर्त्रुत्य रेल्वेने दिला आहे. मंगळवार दि. 28 रोजी दुसऱया टप्प्यातील स्पिड ट्रायल होणार असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

डीजेचा ठेका अन् सामूहिक विसर्जन

Amit Kulkarni

खानापूर दुर्गम भागातील विकासकामांचे ब्ल्यू प्रिंट तयार करा

Amit Kulkarni

गटार बांधकामामुळे जलवाहिनी फुटल्याने नुकसान

Amit Kulkarni

सुळगे (ये.) गायरान जागा गावासाठी राखीव ठेवा

Omkar B

लेप्टनंटपदि बढती-शिवोली ग्रामस्थातर्फे चांगाप्पा पाटील यांचा सत्कार

Rohan_P

जुने बेळगाव नाका परिसरातील दारू दुकाने बंद करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!