प्रतिवर्षी साडेसहा टक्के व्याजदराची अपेक्षा : लवकरच निविदा काढणार
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाने विक्री केलेल्या निधीचा वापर कणबर्गी येथील योजनेच्या विकासकामांसाठी केला जाणार आहे. मात्र अद्याप कणबर्गी योजनेला मंजुरी मिळाली नसल्याने बुडाकडे जमा झालेली 123 कोटीची रक्कम बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता बुडाने निविदा काढली असून साडेसहा टक्क्मयांहून अधिक व्याजदराची अपेक्षा आहे.
बुडाने निर्माण केलेल्या विविध वसाहतींमधील खुल्या भूखंडाची विक्री केली होती. त्या माध्यमातून बुडाकडे 123 कोटी रुपये जमा झाले आहेत. कणबर्गी येथील वसाहत योजनेच्या विकासासाठी सदर निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. कणबर्गी योजना राबविण्यासाठी 200 कोटी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे बुडाने विविध वसाहतींमधील कॉर्नर प्लॉट व इतर भूखंडांची विक्री लिलावाद्वारे केली होती. याअंतर्गत 123 कोटी रक्कम जमा झाली आहे. पण कणबर्गी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली नाही. या योजनेचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
मंजुरीस विलंब होत असल्याने 123 कोटींची रक्कम बुडाच्या खात्यावर पडून राहण्याची शक्मयता आहे किंवा अन्य कामासाठी खर्च होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ही रक्कम बँकेमध्ये एफडी ठेवण्याचा निर्णय बुडाने घेतला आहे. प्रतिवर्षाला किमान साडेसहा टक्के व्याज अपेक्षित आहे. बँकांमध्ये ही रक्कम एफडी ठेवण्यासाठी बुडाने निविदा प्रक्रिया काढली आहे. जी बँक जादा व्याजदर देईल. त्या बँकेत ही रक्कम एफडी ठेवण्यात येणार आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही रक्कम ठेवली जाणार असून योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर विकासकामे राबविण्यासाठी या निधीचा वापर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर एफडीवर साडेसहा टक्क्मयांहून अधिक व्याजदर देऊ इच्छिणाऱया बँकांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.