अनेक वर्षांपासून सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत : कर्मचाऱयांच्या कागदपत्रांची छाननी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील 1249 ग्रामपंचायत कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर 307 कर्मचाऱयांना सरकारने मंजूर केलेल्या 15 व्या वेतन आयोगाप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सरकारकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तसेच काही कर्मचाऱयांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचे जि. पं. सीईओ एच. व्ही. दर्शन यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
बेळगाव जिल्हय़ातील 492 ग्रामपंचायतींमध्ये 3110 कनि÷ कर्मचारी आहेत. त्यात शिपाई, स्वच्छता कामगार आणि वॉटरमन (पाणके) यांचा समावेश आहे. त्यापैकी 1861 कर्मचाऱयांना नोकरीत कायम करण्यात आले आहे. तर 555 कर्मचाऱयांचे प्रस्ताव तालुका पंचायतींने, 434 प्रस्ताव जिल्हा पंचायतींने पुरस्कृत केले आहेत. वयाचे दाखले, नोकरीत रुजू झाल्याच्या तारखांमध्ये फेरफार झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
ग्रा. पं. कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱयांकडून वारंवार आंदोलन केले जात आहे. बेळगावमधील सुवर्ण सौधमध्ये झालेल्या अधिवेशनातही सरकारकडून अलिकडेच आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्ष कर्मचाऱयांच्या नोकरीतील नोंदीमधील त्रुटी स्थानिक पातळीवर दूर करण्याची गरज आहे. त्यानंतरच ही समस्या सुटेल, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्ही. पी. कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
निवृत्तीला आले तरी वंचितच…
अनेक कर्मचारी येत्या काही वर्षांत निवृत्त होणार आहेत. मात्र ते शासकीय सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. ते नोकरीत कायम न झाल्यामुळे त्यांना निवृत्ती प्रित्यर्थ अपेक्षित लाभदेखील मिळणार नाहीत. काही कर्मचाऱयांची ग्रामपंचायतीच्या दप्तरात व्यवस्थित नोंद नाही. 1995 पासून कार्यरत असणाऱया कर्मचाऱयांची नोंद अलिकडच्या काळात भरण्यात आली असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.
कर्मचाऱयांची स्थिती
तालुका | ग्रा.पं. | एकूण कर्मचारी | सेवेत कायम कर्मचारी | जि. पं. कडे प्रलंबित प्रकरणे | 15 व्या वित्त आयोगापासून वंचित कर्मचारी |
रामदुर्ग | 37 | 221 | 142 | – | 32 |
सौंदत्ती | 44 | 277 | 167 | 23 | 44 |
बैलहोंगल | 34 | 175 | 114 | 14 | – |
कित्तूर | 17 | 97 | 60 | – | 17 |
गोकाक | 33 | 275 | 145 | 13 | 24 |
मुडलगी | 20 | 141 | 97 | – | 14 |
हुक्केरी | 52 | 384 | 208 | 24 | 46 |
चिकोडी | 36 | 248 | 138 | 6 | 3 |
निपाणी | 27 | 161 | 80 | 22 | 21 |
रायबाग | 38 | 153 | 106 | 5 | 2 |
अथणी | 46 | 252 | 187 | 12 | 43 |
बेळगाव | 57 | 398 | 163 | 75 | 10 |
खानापूर | 51 | 328 | 254 | 37 | 51 |
एकूण | 492 | 3110 | 1861 | 231 | 307 |