Tarun Bharat

इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी हिंसाचार; १२९ जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम/तरुण भारत

indonesia football match violence: इंडोनेशियातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार घडला आहे. या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू झाला असून, १८० च्यावरती लोक गंभीर जखमी झाले आहेत. सामन्याचा निकाल लागल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात धुडघूस घातला त्यामुळे हिंसाचार घडला असं पोलिसांनी सांगितलं. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे.(129 people killed at violent football match in Indonesia)

इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. येथील मैदानात Persebaya Surabaya आणि Arema FC यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यात अरेमा एफसी संघाचा पराभव झाला. त्यामुळे या संघाच्या समर्थकांनी मैदानातच मोडतोड सुरू केली. त्यांनी मारहाणही केली. यामुळे २ पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि ३४ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इंडोनेशियन राष्ट्रीय सशस्त्र दलाचे जवान स्टेडियमवर पोहोचले. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा करत त्यांनी खेळाडूंना सुरक्षितपणे स्टेडियमबाहेर काढलं. दरम्यान, स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एकच ढापलं उडाली यामध्ये चेंगरा चेंगरी झाली. यात काही लोक मृत्युमुखी पडले तर खैजन जखमी झाले. यावेळी जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात उपचारादरम्यान ९३ लोकांचा मृत्यू झाला.

Persebaya Surabaya ने इंडोनेशियातील Arema FC संघावर मात करत फुटबॉल सामना 3-2 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे Arema FC च्या नाराज चाहत्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. या घनटेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसंच, पोलिसांकडून लाठीजार्च झाल्याचंही यामध्ये दिसतंय. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

हे ही वाचा : सचिन वाझे मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी पाठवायचा; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Related Stories

वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी जळून खाक

datta jadhav

हरनाझ संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’ची मानकरी

datta jadhav

मुंबईत आजही मुसळधार : गरज नसल्यास घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Tousif Mujawar

सपाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून योगींची केली तक्रार

Archana Banage

कोचर दाम्पत्याला दिलासा; तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

datta jadhav

भ्रष्टाचार प्रकरणी फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगवास

datta jadhav