पुणे / प्रतिनिधी :
12th online application process starts from tomorrow राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या ऑनलाईन अर्जप्रक्रियेस उद्या (दि. 1) पासून प्रारंभ होत आहे. दि. 1 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. विद्यार्थ्यांनी ‘सरल डेटाबेस’ वरून कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुखांमार्फत अर्ज करावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरवषीप्रमाणे यंदाही ऑनलाईन पद्धतीने परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठीच्या तारखा गुरूवारी जाहीर करण्यात आल्या. मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी-पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन कनिष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरायची आहेत.
उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
अधिक वाचा : …तर सेना दुर्बिणीने शोधावी लागेल, सत्तारांचा उद्धव ठाकरेंना इशारा