Tarun Bharat

13 रोजी ‘गति शक्ती’ मास्टरप्लॅन

Advertisements

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण- पायाभूत प्रकल्पांच्या क्षेत्रात घडणार क्रांती

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टरप्लॅनचे अनावरण करणार आहेत. याच्या अंतर्गत 2025 पर्यंत सर्व पायाभूत संरचना संपर्कयंत्रणा प्रकल्पांची योजना आखण्यासाठी केंद्र सरकराच्या 16 विभागांना एकत्र आणले जाणार आहे. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ अनुप्रयोग आणि भू-सूचना विज्ञान संस्थेने पूर्ण देशाच्या जीआयएस मॅपिंगसोबत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टरप्लॅन तयार केला आहे.

राज्य सरकारांना देखील सर्व पायाभूत प्रकल्प आणि संपर्कव्यवस्था प्रकल्पांच्या योजनांसाठी भागीदार म्हणून व्यासपीठाशी जोडले जाण्याकरता संपर्क साधला जातोय. या योजनेत 2020-21 पर्यंत निर्मित सर्व प्रकल्पांचा सर्व तपशील आहे. याचबरोबर 2025 पर्यंतच्या 16 विभागांच्या सर्व केंद्रीय प्रकल्पांना सामील करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून गति शक्ती योजनेची घोषणा केली होती. यात रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि गॅस, वीज, दूरसंचार,  जलवाहतूक, विमानोड्डाण आाणि औद्योगिक वसाहती स्थापन करणाऱया विभागांसह 16 केंद्र सरकारच्या विभागांना सामील करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणाईला रोजगाराच्या संधी प्रदान केल्या जाणार आहेत. योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहे.

केंद सरकार योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी 16 विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱयांचा ‘नेटवर्क प्लॅनिंग ग्रूप’ स्थापन करणार आहे. देशाच्या सर्वोत्तम हितार्थ देशाच्या साधनसामग्रीचा उत्तम वापर करण्याचा यामागे विचार आहे. सर्व राज्यांना 13 ऑक्टोबर रोजी या योजनेच्या अनावरण कार्यक्रमात सामील होण्यास सांगण्यात आले आहे.

Related Stories

स्कुलबस बंद, मग घोडा आहेच!

Patil_p

आरोग्यमंत्र्यांनी मांडला लसीकरणाचा लेखाजोखा

Patil_p

जनधन खात्यात उद्या जमा होणार 500 रुपये

Patil_p

कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढली

Patil_p

मुरादाबाद मध्ये डॉक्टरांवर हल्ला, योगी सरकारकडून दोषींवर कारवाई चे आदेश

prashant_c

देवेगौडा, कडाडींसह चौघे राज्यसभेवर बिनविरोध

Patil_p
error: Content is protected !!