प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी बऱयाच भागात अजुनही पाऊस होत आहे. 22 मे रोजी राज्यातील अनेक जिल्हय़ांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर 13 जिल्हय़ांमध्ये ‘यलो अलर्ट’ची घोषणा करण्यात आली आहे.
कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूमध्ये शनिवारी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्मयता आहे. राज्यातील किनारपट्टी भागात पाऊस सुरूच आहे. भटकळ, गौरीबिदनूर, आनेकल, भागमंडल, परशुरामपूर, रायलपाडू, कुडिलगी, कारवार, विट्ल, अंकोला, कारकल, श्रीरंगपट्टण, बंगारपेठ, गोपालनगर येथे शुक्रवारी पाऊस झाला आहे. कारवार, मंगळूर, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, रायचूर, बळ्ळारी, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हासन, कोडगू, कोलार, मंडय़ा, म्हैसूर, रामनगर, शिमोगा व तुमकूर जिल्हय़ात पाऊस होण्याची शक्यता आहे.
कारवार, मंगळूर, उडुपी, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू, कोलार, म्हैसूर, रामनगर जिल्हय़ांमध्ये ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ातील अनेक भागात शुक्रवारी पाऊस झाला. सिल्कबोर्ड, कोरमंगल, मारतहळ्ळी, एचएएल, महानगरपालिका परिसर आणि इंदिरानगरसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.