फेमाचे नियम पाळण्यात कंपन्या अयशस्वी : कोरोनाचाही प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून 13 फॉरेक्स कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे. यामध्ये काही कंपन्यांनी स्वतःहून आपले परवाने परत दिले आहेत. तर काही कंपन्यांनी परवाने रिन्यूअल करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. तसेच यातील काही कंपन्यांनी मात्र फेमाचे पालन करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांचेही परवाने रद्द केल्याची माहिती यावेळी दिली आहे.
आरबीआयने आपल्या सार्वजनिकपणे सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे, की विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम (फेमा) यांच्या अंतर्गत ज्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कंपन्या या मुंबईच्या जेड ए रायजिंग फॉरेक्स आणि फोरट्रा फॉरेक्स ऍण्ड ट्रव्हलिंग सर्व्हिसेज मधील असल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या व्यतिरिक्त डीकेबी फॉरेक्स, जेपी फॉरेक्स, रिमझिम, फॉरेक्स, राज राजेश्वरी फॉरेक्सण् इवॉन फॉरेक्स, फिनपिक सिक्मयुरिटीज ब्रोकिंग आणि बेलॉक्स आदीचा समावेश आहे. सदरच्या सर्व कंपन्या या मुंबईतील पत्यावर नोंदणीकृत असल्याचे सांगितले आहे.