बेंगळूरु
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी कल्पतरु पॉवर ट्रान्स्मीशनला नुकतेच 1345 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. सदरची माहिती कंपनीने मंगळवारी शेअर बाजाराला दिली आहे. अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रात कार्यरत कंपनीने भारतात तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरही कंत्राट मिळवण्यात यश मिळवलं आहे. ऊर्जा प्रसारण, वितरणासह पाईपलाइन घालण्याचे कंत्राट कंपनीला मिळाले आहे.