Tarun Bharat

138 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत

Advertisements

सद्यस्थितीत दोन कंटेनमेंट झोन : जिल्हय़ात येणाऱयांचा ओघ सुरूच

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यातील नेरुर आणि देवगड तालुक्यातील वाडा या दोन ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. दोन्ही झोनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. कोरोना तपासणीसाठी पाठविलेल्या आणखी 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र 13 मेपासून पाठविलेल्या 138 जणांच्या कोरोना नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व्यक्तींचा ओघ थांबलेलाच नसून अशा व्यक्तींची संख्या 24 हजार 555 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिली.

सध्या जिल्हय़ात दोन ठिकाणी कंटेंनमेंट झोन असून कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू आहे. तेथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 51 अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सदरच्या व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. पैकी 27 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. उर्वरित 24 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

138 नमुन्यांचा अहवाल अजूनही प्रलंबित

जिल्हय़ात एकूण 1 हजार 260 व्यक्ती अलगीकरणात आहेत. पैकी 746 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 514 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 114 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 976 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 968 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 138 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 101 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 33 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, 13 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी 6 हजार 289 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात आढळलेल्या कोरोना बाधित आठ रुग्णांपैकी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून चार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात मंगळवारपर्यंत एकूण 24 हजार 555 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

घरीच अलगीकरण                                 0746

संस्थात्मक अलगीकरण                0514

पाठविण्यात आलेले एकूण नमुने            1114

अहवाल प्राप्त झालेले नमुने                     0976

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने                    0008

निगेटिव्ह आलेले नमुने                0968

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                   0138

विलगीकरण कक्षात दाखल                       0101

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण                   0004

मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती         6289

Related Stories

अखेर चिपळुणात तीन सावकारांवर गुन्हा दाखल

Patil_p

गुहागरातील 1196 लोकांचे स्थलांतर

Patil_p

जिल्हय़ात एकाच दिवशी 30 जण कोरोनामुक्त

Patil_p

रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० जण बेपत्ता

Abhijeet Shinde

मराठमोळ्या पोशाखाचा अमेरीकेत गौरव

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : फेब्रुवारी २०२०पासून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!