Tarun Bharat

14 एप्रिल रोजी सुरू होणार पंतप्रधानांचे संग्रहालय

ऑनलाईन टिम / ऩवी दिल्ली

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) येथील पंतप्रधानांच्या संग्रहालयाचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी होणार आहे. मंगळवारी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संग्रहालय मागील सर्व पंतप्रधानांचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करेल. “मोदींनी सांगितले की प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान असून ते विसरले जाणार नाही” असे या बैठकीत उपस्थित असलेल्या भाजप खासदाराने सांगितले.

तीन मजली असलेले 10,975 स्क्वेअर फूट म्युझियम पहिल्यांदा मार्च 2020 पर्यंत पूर्ण केले जाणार होते. परंतु या प्रकल्पाला अनेक कारणांनी विलंब झाला. 2019 मध्ये डिझाइनचे प्रस्ताव न आवडल्याने सरकारने पहिली बोली परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2020 मध्ये कोविड आणि 2021 मध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. सिक्का असोसिएट्स हे म्युझियम बनवत असून गुडगावची डिझाईन फर्म टॅगबिन त्याची रचना करत आहे. या प्रकल्पाची किंमत 271 कोटी रुपये आहे.

Related Stories

वनवासी वधूची अधिक हुंडय़ाची मागणी

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ; 24 तासात 4814 नवे रुग्ण

Tousif Mujawar

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही

datta jadhav

‘मेक इन इंडिया’ झाला ‘बाय फ्रॉम चायना’, भाजप म्हणजे बीजिंग जनता पक्ष : काँग्रेस

Abhijeet Khandekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची घेतली भेट

Archana Banage

एस. नवकिशोर रेड्डी सिंधुदुर्गचे नवे उपवनसंरक्षक

Anuja Kudatarkar